कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ।।
- Team ShivShakti
- Jul 23, 2020
- 3 min read
माणुसकी हाच धर्म, समाजसेवा हेच कर्म : आम्ही शिवशक्ती
तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. फळाची अपेक्षा करू नको. उचित क्षणी तुला नक्कीच फळ मिळेल या भगवत गीतेच्या उक्तीप्रमाणे शिवशक्ती सोशल फौंडेशन शिवाजीनगर ता. कडेगांव हि सामाजिक संस्था कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गेली ७ वर्षे निस्वार्थी, समाजिक कार्य करीत आहे. माझा निसर्गाने बनविलेल्या नियमांवर पूर्ण विश्वास आहे. निसर्गाचा सर्वात सुंदर, सोनेरी नियम सदासर्वदा देणे हाच आहे. जो समाजाला काही देऊ शकत नाही तो कधीच आनंदी राहू शकत नाही. अशी समाजशील विचारसरणी असणारे युवानायक मा. प्रमोदभाऊ मांडवे यांनी सन २०१३ साली शिवशक्ती सोशल फौंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करून समाजसेवेची चळवळ सुरु केली. माणुसकी हाच धर्म आणि समाजसेवा हेच कर्म हे ब्रीद अंगीकारून युवक कल्याण, क्रीडा, शिक्षण, शेती व ग्रामविकास, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कला आणि संस्कृती आणि इतर अनेक क्षेत्रांत उलेखनीय असे सामाजिक कार्य चालू आहे.
शिवशक्तीचा २०००० पेक्षा जास्त लोकांशी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून थेट संपर्क आहे. तसेच १२०० पेक्षा जास्त लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अनमोल कार्य शिवशक्तीच्या माध्यामतून झाले आहे. कृषी आणि ग्रामविकास क्षेत्रात संस्था महत्वपूर्ण कार्य करीत असून संस्थेच्या माध्यामातून विविध शासकीय आणि खाजगी विभागांच्या सहकार्याने रु. २५ लक्ष पेक्षा जास्त किंमतीची खते शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आली आहे. शेतकरी सक्षमीकरणासाठी शिवशक्ती फौंडेशनने शेतकऱ्यांना एकत्र करून शिवशक्ती शेतकरी गट स्थापन केला या गटाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा प्रसार-प्रचार आणि अंमलबजावणी केली जात आहे. शिवशक्ती कृषी औजारे बँक या सवलतीत भाडेतत्वावर शेती औजारे सुविधा पुरविण्याचा प्रकल्प संस्थेने यशस्वीरित्या राबविला आहे. शेतकऱ्यांना जे जे पाहिजे ते सर्व पुरविण्याचे कार्य शिवशक्तीच्या माध्यामातून होत आहे.
राष्ट्राची प्रगती करायची असेल तर युवकांना घडविले पाहिजे. यासाठी युवकांना चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे आणि स्वावलंबी बनविणारे शिक्षण दिले पाहिजे असे स्वामी विवेकांनद यांनी सांगितले होते अगदी त्याचप्रमाणे शिवशक्तीने युवकांना विकासाचा धागा बनवून चांगले शिक्षण, पायाभूत सुविधा, सर्वोत्कृष्ठ मार्गदर्शन आणि सर्वकाही उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. युवाजागृती या प्रकल्पातून विद्यार्थी आणि युवकांना घडविण्याचे कार्य शिवशक्ती करीत आहेत. संस्थेने कै. अधिकभाऊ मांडवे यांच्या नावाने वाचनालयाची स्थापना शिवाजीनगर ता. कडेगाव येथे केली आहे. वाचनसंस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय सदर मोफत सार्वजनिक वाचनालय गेले ७ वर्षे अविरत सुरू आहे. भारतीय कला संस्कृती आणि महापुरुषांचे आचार-विचार यांचे संवर्धन आणि प्रसार होणे गरजेचे आहे आणि म्हणूनच विविध चर्चासत्रे, व्याख्याने, जयंती उत्सव आदींच्या माध्यमातून कला, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ वाढविण्याचे कार्य शिवशक्ती करीत आहे. पृथ्वी ही आपली माता आहे तिच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे. आणि हीच जबाबदारी शिवशक्तीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. ' गो ग्रीन हो क्लीन ' चित्रकला स्पर्धा ', माझा गांव स्वछ गांव अभियान, वृक्षलागवड चळवळ आदी पर्यावरण रक्षणाचे उपक्रम शिवशक्तीच्या माध्यमातून ग्रामीण भागात राबविले आहेत. महिलांच्या सहभागाशिवाय आपण पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही असे शिवशक्तीचे मत आहे आणि म्हणूनच महिला सक्षमीकरण हा विषय घेऊन संस्था कार्य करीत आहेत. महिलांना आर्थिक आणि सामाजिक सक्षम बनविणे व पुरुषांबरोबर समान दर्जा देणे हेच उद्दीष्ठ ठेऊन महिलांना प्रशिक्षित करण्याचे कार्य शिवशक्ती संस्था करीत आहे. प्रत्येक वर्षी ११००० दिनदर्शिका मोफत वितरण करण्याचा विक्रम शिवशक्तीने केला आहे. शिवशक्ती दिनदर्शिका छपाई आणि मोफत वितरण करण्यामागचा हेतू एवढाच की, लोकांनी आयुष्यात वेळ काळ याला महत्व देऊन या दिनदर्शिकेचे माध्यमातून आयुष्याचे नियोजन करून यशवी व्हावे. सूक्ष्म पण प्रभावी असा उपक्रम शिवशक्तीच्या माध्यमातून गेली ६ वर्षे राबविला जातोय.
गोरगरीब, वंचित, मागास लोकांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करणे आणि समाजविकास होण्याच्या हेतूने शिवशक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या निस्वार्थी सामाजिक कार्याला युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या जिल्हास्तरीय " सर्वोत्कृष्ठ युवा संस्था " या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच शिवशक्ती सोशल फौंडेशनने स्वच्छता व ग्रामविकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याला सन २०१६/१७ साली " युवा मंडळ " पुरस्काराने भारत सरकार स्थापित नेहरू युवा केंद्र, सांगली यांच्यातर्फे गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकरी सक्षमीकरणासाठी संस्थेने स्थापन केलेल्या शिवशक्ती शेतकरी गटाला कृषी सन्मान २०१९ या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत गौरविण्यात आले आहे. आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे आपण चिकित्सकपणे पाहिले नाही आणि या प्रश्नांबद्दल आपण आपल्या योगदानातून आणि कृतीतून निर्भिडपणे व्यक्त झालो नाही तर सजग नागरीक आणि मनुष्य म्हणून आपण सामाजिक दृष्ट्या मृतप्राय होऊ म्हणून आपली सर्व लोकांची जबाबदारी आहे कि, आपण शिवशक्ती फौंडेशनच्या अश्या निस्वार्थी-सामाजिक कार्याला सहकार्य केले पाहिजे. आपले योगदान दिले पाहिजे.
माणुसकी हाच धर्म आणि समाजसेवा हेच कर्म मानून समाज विकासाच्या चळवळीला सहकार्य करा. शिवशक्तीला सहकार्य करा. शिवशक्ती सोशल फौंडेशनला आयकर विभागाकडून 80G हे प्रमाणपत्र मिळाल्याने आपण केलेले दान हे करमुक्त आहे. शिवशक्ती फौंडेशनला सहकार्य करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा : +९१ ९६ ७३ ३७ १७ ८५
Donate and Get 50% Tax Exemption Under 80G of IT Act 1961. Click Below Donate Button.
Comments